मुंबई | प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला मृत्यूची खोटी बातमी पसरवणे महागात पडले आहे. आता पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. तर तिच्या चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
पूनमच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूची बातमी इंस्टाग्रामव्दारे पोस्ट केली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की मॉडेलचा मृत्यू सर्वायकल कँसरमुळे झाला आहे. त्यानंतर आज तिने मीडियासमोर येऊन मृत्यूची बातमी पसरवण्यामागचे कारणही सांगितले, पण आता हा विनोद करणे आता तिला महागात पडले आहे.
फेक न्यूज पसरवल्या प्रकरणी पूनम पांडे तुरुंगात जाणार का?
पूनम पांडेने स्वतः इंस्टाग्रामवर तिच्या मृत्यूची खोटी बातमी शेअर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर लोकं संतप्त झाले आहेत. अशा परिस्थितीत, फेक न्यूज पसरवल्याबद्दल पूनम पांडेवर कायदेशीर कारवाई होईल का, हे जाणून घेणं आवश्यक (Poonam Pandey death rumors) आहे.
फेक न्यूज पसरवल्याबद्दल अभिनेत्रीला तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच दंडही आकारला जाऊ शकतो. आयटी कायदा-2000 च्या कलम 67 अंतर्गत, सोशल मीडियावर पहिल्यांदा अफवा पसरवल्याबद्दल कोणी दोषी आढळल्यास, त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ (Poonam Pandey Fake News) शकतो. तसेच 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास दोषीला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने पूनम पांडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात एआयसीडब्ल्यूएने मुंबईतील विक्रोळी पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे AICWA ने मॉडेल पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरवर एफआयआर नोंदवण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सत्यजित तांबेंनी केली कारवाईची मागणी : वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडेनं आपल्या निधनाची सोशल माध्यमांवर थाप मारुन हा जाहीरातीचा भाग होता, असं स्पष्ट केलं. मात्र त्यामुळं अनेकांची फसगत झाली. पूनम पांडेनं मारलेल्या या निधनाच्या थापेबाबत आता चित्रपटसृष्टीतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सत्यजित तांबे यांनीही मुंबई पोलिसांना ट्विट करत एक्सवर पोस्ट केली आहे. पूनम पांडेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.
पूनम पांडेच्या मृत्यू बाबत उल्लेख : प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा होती. याबाबत अनेकांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं होतं. मात्र अचानक पूनम पांडेनं स्वतः माध्यमांसमोर जिवंत असल्याची माहिती दिल्यानं आश्चर्याचा धक्काच बसला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूनम पांडेच्या निधनाची माहिती घेतली होती. मात्र अभिनेत्री पांडे जिवंत असल्याची माहिती अजित पवारांना नसल्यानं त्यांनी भर सभेत दुःख व्यक्त केलं. अफवेवर विश्वास ठेवून अजित पवारांनी भाषणात पूनम पांडेच्या मृत्यू बाबत उल्लेख केला.