Career

कम्प्युटरची आवड आहे? मग ‘हा’ कोर्स करून भविष्य बदलवणारे करिअर निवडा.. जाणून घ्या सविस्तर | Career in Computer Technology

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात झपाट्याने बदल घडत आहेत. डिजिटल क्षेत्रात नवनवीन क्रांती घडत आहे. अशात जर आपल्यालाही आपल्या कम्प्युटरच्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी करून दाखवयाचे असेल तर या विद्यार्थ्यांनी ‘बीसीए’ ला प्रवेश घेणे गरजेचे आहे. कारण जर तुम्हाला कम्प्युटरची आवड असेल तर ‘बीसीए’ हा बारावी नंतरचा सर्वोत्तम करिअरचा पर्याय आहे.

Career in computer technology

‘बीसीए’ म्हणजे काय : ‘बीसीए’ हा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये कम्प्युटर क्षेत्राशी संबधित पदवी मिळते. यामध्ये कॉम्प्युटर एप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, प्रोग्रॅमिंग लँग्वेज, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, एप डेव्हलपिंग, वेब डेव्हलपिंग याविषयांचे सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या पदवी नंतर तुम्ही अधिक तज्ज्ञता मिळवण्यासाठी ‘एमसीए’ हा कोर्स देखील करू शकता. कम्प्युटर, प्रोग्रामिंग आणि आयटी क्षेत्रात ‘बीसीए’च्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे.

‘बीसीए’ अभ्यासक्रमाची फी : बीसीए हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे. ज्याचा फुलफॉर्म ‘बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन’ असा आहे. हा तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम असून कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी ‘बीसीए’ला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाची सरकारी महाविद्यालये खूपच कमी आहेत. तर खासगी महाविद्यालयात अंदाजे प्रती सत्र 20 ते 50 हजार इतकी या कोर्सची फी आहे.

‘बीसीए’ मध्ये काय शिकाल : ‘बीसीए’ कोर्स संगणक आणि तंत्रज्ञान यावर पुर्णपणे आधारलेला असून यामध्ये सॉफ्टवेअर, कम्पुटर नेटवर्क, वेब डिझाइन, कम्पुटर प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कम्प्युटर बेसिक याविषयी विस्तृत ज्ञान दिले जाते. ज्यामध्ये प्रॅक्टिकलचा देखील मोठा भाग असतो. एखादे सॉफ्टवेअर विकसित करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, कम्प्युटर नेटवर्कशी संबधित अडचणी दूर करणे, नवे संशोधन करणे, प्रोफेशनल वेबसाइट बनवणे, मोबाईल ऍप्लिकेशन तयार करणे यासह अनेक सूक्ष्म गोष्टींचे ज्ञान दिले जाते.

‘बीसीए’ मधील करिअरच्या संधी : बीसीए नंतर तुम्हाला सरकारी आणि निमसरकारी तसेच खासगी कंपन्यांमध्ये अनेक नोकर्‍या उपलब्ध आहेत. या क्षेत्रात पगारही भरपूर दिला जातो. तुम्ही तुमचे ज्ञान, अनुभव आणि संशोधनाच्या जोरावर फ्रीलांसर म्हणून देखील काम करू शकता. सध्या आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असल्याने भारतासह परदेशातही अनेक संधी आहेत. ओरॅकल, आयबीएम, इन्फोसिस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल, डेल या आणि अशा अनेक कंपन्यांमध्ये ‘बीसीए’ उत्तीर्ण उमेदवारांची गरज भासते. तसेच माहिती प्रणाली व्यवस्थापक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, बँकिंग एक्स्पर्ट, अ‍ॅप्लीकेशन तज्ञ, वेब डिझायनर, सिस्टम ऑर्गनायजर, कम्प्युटर प्रोग्रॅमर, डेटाबेस एक्स्पर्ट अशा विविध पदांवर तुम्ही अधिकारी म्हणून काम करू शकता.

Back to top button