Career

बारामती सहकारी बँक येथे विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Baramati Sahakari Bank Bharti 2024

पुणे | बारामती सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Baramati Sahakari Bank Bharti 2024) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार एकूण 60 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Baramati Sahakari Bank Bharti 2024

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे. ई-मेल पत्ता – pba.recruit.bsb@gmail.com

वयोमर्यादा –

  • लिपीक – २३ ते ३५ वर्षे.
  • कनिष्ठ अधिकारी – २५ ते ४५ वर्षे
  • सरव्यवस्थापक : वसूली – ४० ते ५० वर्षे
  • मुख्य जोखीम अधिकारी – ३५ ते ४५ वर्षे
पदाचे नावपद संख्या 
लिपीक40
कनिष्ठ अधिकारी10
माहिती व सांख्यकीय अधिकारी02
नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर02
सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर02
सरव्यवस्थापक : वित्त01
सरव्यवस्थापक: प्रशासन01
सरव्यवस्थापक : वसूली01
मुख्य जोखीम अधिकारी01
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपीकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT/ समतुल्य (Equivalent Certification Course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक व द्विपदवीधारक तसेच जोडीसी अॅण्ड ए डिप्पोमा त्याचप्रमाणे संगणक पदविकाधारक व इंग्लिश व मराठी टायपिंग, सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणा-यांना प्राधान्य
कनिष्ठ अधिकारीउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT / समतुल्य (Equivalent Certification Course) व द्विपदवीधारक तसेच एमबीए, GDC&A तसेच नागरी बँकांमधील कामाचा अनुभव आवश्यक
माहिती व सांख्यकीय अधिकारीउमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक / द्विपदवीधारक एमबीए C.A.I.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले सी.ए. अॅपोयर्ड, बैंकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव
नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटरकॉम्प्युटर प्रॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, CISCO सारखे नेटवर्क सर्टिफिकेशन, अरुबा समान नेटवर्क प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, फायरवॉल, Firewall, NMS, Router, Switch and Layered Network Configuration चे ज्ञान आवश्यक
सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटरकॉम्प्युटर अॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, Windows Server Installation, Configuration & Maintain तसच IIS, Web Server, Database Server Like Oracle, MS SQL, Azure चे ज्ञान आवश्यक.
सरव्यवस्थापक : वित्त
सरव्यवस्थापक: प्रशासन
सरव्यवस्थापक : वसूलीपदांसाठी पदवीधर, व्दिपदवीधर, एम.बी.ए. C.A.1.1.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सौ.ए./ (अॅपीयर्ड), ICWA पूर्ण किंवा अपीयर्ड, सरव्यवस्थापक पदांसाठी बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ७ ते ८ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव,
मुख्य जोखीम अधिकारीउमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक/द्विपदवीधारक एमबीए /C.A.LIB./ ICWA/C A आर्टिकलशिप पूर्ण केलेले सी.ए. अॅपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंबित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत/खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातBaramati Sahakari Bank Online Notification 2024
अधिकृत वेबसाईट https://www.baramatibank.com/

Back to top button