आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत 192 रिक्त जागांची भरती; थेट लिंक द्वारे अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023
नाशिक | आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरती (Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023) अंतर्गत एकूण 182 रिक्त जागांची भरती केली जाणार असून याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023
अधिसूचनेनुसार उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
- खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
PDF जाहिरात – Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Adivasi Vikas Vibhag Nashik Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.