Career

जिल्हा परिषद परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर | Zilla Parishad Bharti 2023

मुंबई | जिल्हा परिषद भरतीच्या पुढील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. खालील लिंक वरून आपण यासंबधित PDF पाहू शकता.  (Zilla Parishad Bharti 2023)

  • परीक्षा वेळापत्रक सूचना : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) या पदांची परीक्षा दिनांक १७ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी पाच शिफ्ट मध्ये होणार आहे व वरिष्ठ सहायक या पदाची परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी होणार आहे.
  • [कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) आणि औषध निर्माण अधिकारी] नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षा २१,२२,२३ ऑक्टोबर २०२३ या रोजी घेण्यात येणार होत्या, त्याऐवजी या पदांसाठीचे सुधारित वेळापत्रक तसेच उर्वरित पदांसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.
  • पर्यवेक्षिका पदाची दिनांक : १८-१०-२०२३ रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती, सुधारित वेळापत्रक कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेस्थळांना भेट देत राहा.

Previous Update :- Zilla Parishad Bharti 2023
जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षा दिवाळीनंतर होण्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या सरळ सेवा पदभरतीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत १४ संवर्गातील पदांसाठी एकूण ३१५५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ५४६ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला गैरहजर ( राहिले, तर २६०९ उमेदवारांनी परीक्षा दिली.

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 मधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहेत. यातील पहिल्या दोन टप्प्यात दि. ७ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत १४ संवर्गातील पदांसाठी परीक्षा झालेली आहे. या पदांसाठी ३१५५ उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. परंतु त्यातील ५४६ जणांनी परीक्षेला दांडी मारली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या या पदभरतीची परीक्षा सुरू झाल्यापासून अनेक अडथळे येत आहेत. अनेकदा या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले. आता १४ दिवसांच्या खंडानंतर दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात १ नोव्हेंबर रोजी जुनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक असे पेपर झाले. आता दि. २ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर ६ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) असे पेपर होणार आहेत.

दरम्यान, ६ नोव्हेंबरनंतरचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. १२ नोव्हेंबरला दिवाळी आहे. त्यामुळे उर्वरित पदांची परीक्षा आता दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक (महिला, पुरूष), कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), औषध निर्माण अधिकारी या पदांसाठीची परीक्षा अजून बाकी आहे.


राज्यातील काही उमेदवारांनी ज्या दिवशी पेपर आहे त्याच दिवशी हॉलतिकीट डाउनलोड करण्याचा केला. परंतु पेपरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही हॉलतिकीट उपलब्ध करून देणारी लिक बंद केली जाते. नंतर त्यावरून हॉलतिकीट मिळत नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी पहिलेच आपले प्रवेशपत्र डाउनलोड करणे गरजेचे आहे. 

Back to top button