Blog

गुणरत्न सदावर्तेच्या मालकाचा नेमका उद्देश काय? क्रोनोलॉजी समजून घ्या… | Gunaratna Sadavarte

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे, असा जाहीर आरोप करुन 2 वर्षांसाठी वकीलीची सनद रद्द झालेल्या गुणरत्न सदावर्तेना (Gunaratna Sadavarte) काय साध्य करायचं आहे? कोणतं नेरेटिव्ह त्यांना सेट करायचं आहे? नेमका कोणता फायदा फडणवीसांना मिळवून द्यायचा आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.

मराठा आरक्षण आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असे जाहीर वक्तव्य सदावर्तेनी केल्याने सकल मराठा समाजाची मते शरद पवारांच्या मागे जातील याची भीती फडणवीसांच्या सदावर्तेना का वाटत नाही? कारण…

मराठा आरक्षण ओबीसी मधुन देण्याच्या मागणीमधून निर्माण झालेल्या ध्रुवीकरणात, मराठा लोकसंख्येपेक्षा बहुसंख्य असणाऱ्या ओबीसींची (प्रवर्गाची मते) मते महाविकास आघाडीच्या विरोधात जावी, यासाठीच मराठा आंदोलनाला शरद पवारांचा हात आहे असा नेरेटिव्ह सेट करण्यास सुरवात सदावर्ते कडून सुरु झाली आहे. आणि शरद पवारांची कायम संशयास्पद इमेज याला पूरकच आहे! (आरक्षण मिळो अथवा न मिळो)

तर दुसरीकडे धनगर आरक्षण, आदिवासी आरक्षण यांच्या सध्या सुरु असलेल्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे, असे सत्ताधारी मंडळी सदावर्तेच्या तोंडून म्हणत नाही. कारण धनगर आणि आदिवासींची मते बहुतेक प्रमाणात फिक्स आहेत! स्थानिक नेत्यांच्या मागे एकवटलेली आहेत. त्यामधे फूट पाडणे सहजी शक्य नाही!

पण ओबीसींची मते ही फ्लकच्युएट मते आहेत. ओबीसी प्रवर्ग ३४६ वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या प्रदेशानुसार विभागली गेली आहेत. एखाद्या नेत्याच्या मागे हि मते ओबीसी प्रवर्ग म्हणून एकवटलेली नाहीत. हि मते सातत्याने बदलण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून ओबीसींची प्रत्येक निवडणूकनिहाय बदलणारी अस्थिर मतांमधील जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठीच्या प्रयत्नांचा फायदा थेट भाजपाला मिळवण्यासाठी फडणवीसांचा सदावर्ते पवारांच्या विरोधात नेरेटिव्ह सेट करण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहे.

आरक्षण मिळेल अथवा नाही मिळेल. पण केवळ ओबीसी मधून केलेल्या आरक्षण मागणीमुळे मराठा विरुध्द ओबीसी असं ध्रुवीकरण आपोआप झालेलं आहे. त्यासाठी विद्यमान मंत्री छगन भुजबळ जबाबदार आहेतच. आणि असं होणं शक्य आहे! साहजिकच आहे.

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण केंद्र सरकार देत नसल्याने त्यांनी राज्य सरकारकडून ओबीसी मधून मागणी करणे हेसुध्दा योग्यच आहे. कारण ओबीसी आरक्षण संविधानिक नसून महाराष्ट्र विधिमंडळाने दिलेले वैधानिक आरक्षण आहे. पण आरक्षण मागणीच्या मागील भावनिकतेमुळे वास्तवतेकडे दुर्लक्ष होऊन आंदोलन आक्रमक होईल आणि मराठा विरुद्ध ओबीसी ध्रुवीकरण आणखी सोपं होईल.

एका बाजूला सदावर्तेने मराठा आंदोलनामागे शरद पवार आहेत हे सांगत सुटणे. तर दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी ओबीसी आरक्षणातील एक टक्काही इतरांना देणार नाही असे सांगणे. म्हणजेच, शरद पवार ओबीसींच्या विरोधात आहेत हे ठळक करणे.

शरद पवारांच्या सोबत २ पक्षांची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी ओबीसींच्या विरोधात आहे हे नेरेटिव्ह सेट करण्यासाठी मदत होईल. या हेतूने जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शरद पवारांचा हात आहे. हे मेडीयाच्या माध्यमातून बिंबविन्यासाठी सदावर्तेने तातडीनं पत्रकार परिषद घेतली. आणि मेडियाने पण त्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ दिला.

तुषार गायकवाड

Back to top button