News

नव्या संसदेची सुरक्षा भेदून दोन तरुणांच्या दर्शक गॅलरीतून थेट सभागृहात उड्या, धुराच्या नळकांड्या पेटवल्या | Security breach in Loksabha

नवी दिल्ली | संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झालेली असतानाच आणि दिवसाच्या आठवणी आजही अनेकांचं मन सुन्न करत असतानाच 13 डिसेंबरला पुन्हा एकदा देशाच्या संसदेत अशीच धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून संसदेसारख्या वास्तूच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. 

संसदेत (Parliament Winter Session 2023) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे (Security breach in Loksabha) देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून (Audience Gallery) दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत (Lok Sabha) एकच हल्लकल्लोळ माजला. त्याचदरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात (Security Breach) घेण्यात आले आहे.  

ताब्यात घेतलेल्यांपैकी एक जण महाराष्ट्रातील (Maharashtra News) लातूर जिल्ह्यातला (Latur District) आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतले आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील (Delhi) संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघा महिला आणि पुरुषांनी पहिल्यांदा संसद भवनाबाहेर फटाके फोडले होते, त्यानंतर त्यांनी भारत माता की जय, जय भीम, हुकूमशाही चालणार नसल्याच्या घोषणा दिल्या. हा गोंधळ परिवहन भवनजवळ घडल्याने जोरदार गोंधळ उडाला होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने त्यांनी हा मार्ग निवडला असल्याचे या दोघांनी सांगितले. 

Back to top button