Career

तरुणांनो! तुमच्याकडं चांगली बिझनेसची आयडिया आहे का? शासनाची ‘ही’ योजना करेल तुम्हाला मदत, 30 एप्रिल पर्यंत करा अर्ज | Sarathi Training for New Entrepreneurs

पुणे | सध्या सर्वत्र स्टार्ट अपचे वारे सुरू आहे. देशात विविध स्वरूपाचे स्टार्ट अप सुरू होत असून त्याद्वारे लाखो करोडो रूपयांचा व्यवसाय केला जात आहे. म्हणूनच शासनाच्या वतीने देखील स्टार्टअप साठी सहाय्य पुरवले जाते. मराठा अथवा कुणबी समाजातील स्वतःचे स्टार्टअप उभारू पाहणाऱ्यां युवकांना अशाच प्रकारे सहाय्य (Sarathi Training for New Entrepreneurs) करण्यात येते.

सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरीत करण्यासाठी हे सहाय्य केले जाते. राज्यातील विविध इनक्युबेशन केंद्रांमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येतात.

Sarathi Training for New Entrepreneurs

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी) मार्फत ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनसाठी नोंदणीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता 30 एप्रिल 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा किंवा कुणबी गटातील नवउद्योजकांची एक वर्षासाठी याद्वारे निवड करण्यात येते.

अटी
– सदर विद्यार्थी किमान पदवीधर असावा
– विद्यार्थ्यांकडे स्वतःची तंत्रज्ञान व्यवसाय कल्पना असावी
– एका वर्षामध्ये त्याने कल्पनेचे रूपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये करणे आवश्यक आहे
– आर्थिक साहाय्य दिलेल्या काळात विद्यार्थ्यांनी उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्ण वेळ पाठपुरावा आवश्यक आहे

उद्योजकता विकास उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करा – https://sarthi-maharashtragov.in/

राज्यातील इनक्युबेशन केंद्रे आणि उपलब्ध जागा

1. एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे – 10 जागा
2. उद्यम सोलापुर विद्यापीठ इनक्युबेशन सेंटर, सोलापूर – 10 जागा
3. शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅन्ड लिंकेजेस, कोल्हापूर – 10 जागा
4. मराठवाडा एक्सलरेटर फॉर ग्रोथ अॅन्ड इनक्युबेशन कॉंन्सिल, छत्रपती संभाजीनगर – 10 जागा
5. नेत्ररित फाउंडेशन, सांगली – 10 जागा
6. जी. एच. रायसोनी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर फाउंडेशन, नागपूर – 10 जागा

Back to top button