Career

Tech Mahindra कंपनीत 6000 फ्रेशर्सना नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Tech Mahindra Recruitment 2024

पुणे | IT क्षेत्रात दिवसेंदिवस नोकरीच्या संधी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरीची (Job) संधी शोधणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशीच इच्छा असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण लवकरच आयटी क्षेत्रातील (IT Sector) प्रमुख कंपनी टेक महिंद्रामध्ये (Tech Mahindra) फ्रेशर्स (freshers) उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.

टेक महिंद्रा कंपनीत केल्या जाणाऱ्या या भरतीविषयीची (Tech Mahindra Recruitment 2024) माहिती कंपनीच्या पुणे मुख्यालयाने दिली आहे. चालू 2024-25 या आर्थिक वर्षात 6,000 नवीन फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Tech Mahindra Recruitment 2024

दरम्यान, टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दर तिमाहीत 1,500 पेक्षा जास्त नवीन लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच या वर्षभरात आम्ही 50000हून अधिक कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. मोहित जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक महिंद्रा आपल्या कामगिरीत सुधारणा करत आहे. त्यामुळेच आम्ही नोकऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जोशी यांनी दिली. 

25 एप्रिल रोजी CFO रोहित आनंद यांनी सांगितले की, 2027 पर्यंत टेक महिंद्राच्या धोरणाचा एक भाग म्हणून, कंपनी नवीन कर्मचारी तयार करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे यावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे मार्जिन सुधारण्यास मदत होईल.

टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोमध्येही कर्मचारी कमी झाले आहेत
FY24 मध्ये, TCS, Infosys आणि Wipro या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण झाली आहे. टीसीएस आणि इन्फोसिसमध्ये गेल्या दशकात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात TCS मध्ये 13,249 कर्मचारी, Infosys मध्ये 25,994 आणि Wipro मध्ये 24,516 कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

FY24 मध्ये टेक महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6,945 ने कमी झाली होती. आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे. वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यापूर्वी, कंपनीने आर्थिक वर्ष 2018 मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली होती. टेक महिंद्रा व्यतिरिक्त, आत्तापर्यंत फक्त TCS ने सांगितले आहे की ते FY25 मध्ये सुमारे 40,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत आहे. 

Back to top button