‘नमो शेततळे’ अभियानातून आता ‘मागेल त्याला शेततळे’, जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल सविस्तर | Namo Shettale Yojana
मुंबई | महाराष्ट्रातील 82 टक्के जमीन कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड (Dry Spells) या प्रमुख नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करून पाण्याची साठवणूक करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे, त्याचप्रमाणे शेतीला पूरक मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारता यावे याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्याच्या अनुषंगाने नमो शेततळे अभियान राबवण्यात येत आहे.
Namo Shettale Yojana
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राबवल्या जाणाऱ्या 11 सुत्री कार्यक्रमांतर्गत नमो शेततळे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत, महाराष्ट्रात 7300 नवीन शेततळे तयार केली जाणार आहेत. याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे.
नमो शेततळे अभियान शासनाचा जीआर वाचा (Click करा)
छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या मागेल त्याला शेततळे या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांचा समावेश सदर अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांमध्ये करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरिता उपलब्ध निधीतुन नमो शेततळे अभियान राबविण्यात येईल. तसेच सदर अभियानाच्या अंमलबजावणी करिता छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील.
नमो शेततळे अभियानाचे फायदे
- शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल.
- शेतकऱ्यांना वर्षभर सिंचन सुविधा मिळणार.
- शेतकऱ्यांना वर्षभर विविध पीके घेता येतील
- शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल.
- शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.