Career

राज्यात 17,471 पोलीसांची भरती, ‘या’ लिंकवरून त्वरित अर्ज करा | Maharashtra Police Bharti 2024

मुंबई | तुम्हाला देशसेवेची आवड आहे आणि तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलाचा भाग बनू इच्छिता? तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र पोलीस विभाग 2024 मध्ये 17,471 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल (चालक), एसआरपीएफ कॉन्स्टेबल आणि बँड्समॅन पदांचा समावेश आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • अर्ज: ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरू होईल आणि 31 मार्च 2024 पर्यंत चालू राहील. तुम्ही policerecruitment2024.mahait.org किंवा https://www.mahapolice.gov.in/police-recruitment/ या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • पात्रता:
    • तुम्ही 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • तुमचे वय 18 ते 25 वर्षे (पुरुष) आणि 18 ते 23 वर्षे (महिला) असणे आवश्यक आहे.
    • तुमची उंची आणि छातीचा विस्तार (पुरुष) आणि उंची (महिला) यांच्यासाठी निर्धारित निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
    • तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
  • निवड प्रक्रिया:
    • लिखित परीक्षा:
      • परीक्षेचा अभ्यासक्रम: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, तर्कशास्त्र आणि मराठी भाषा.
      • परीक्षेचा स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
    • शारीरिक चाचणी: धावणे, उंच उडी मारणे, लांब उडी मारणे आणि गोळाफेक यांचा समावेश.
    • वैद्यकीय तपासणी: तुम्हाला डॉक्टरांच्या समितीने तपासले जाईल.
    • कागदपत्रांची पडताळणी: तुम्हाला तुमचे शैक्षणिक आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील.

महत्वाचे मुद्दे:

  • अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.
  • वेळेवर अर्ज करा, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करा आणि लिखित परीक्षेची चांगली तयारी करा.
  • शारीरिक चाचणीसाठी नियमित व्यायाम करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.

महाराष्ट्र जिल्हानिहाय पोलीस भरती वेबसाईट:

अधिक माहितीसाठी:


खुशखबर! १७ हजार पोलिसांची मेगाभरती; ‘या’ कालावधीत प्रसिद्ध होणार जाहिरात | Maharashtra Police Bharti 2024

मुंबई | महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलिस दल, तुरूंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची मोठी भरती (Maharashtra Police Bharti 2024) होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात पोलीस भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष भरतीला सुरवात केली जाणार आहे. प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्याची विशेषत: प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीत देखील वाढ होत आहे. असे असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्याठिकाणी लागणार आहे.

Maharashtra Police Bharti 2024

शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने राज्यभरात पोलिस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे देखील पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरवात होईल, असेही गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे.


मुंबई (1 फेब्रुवारी 2024) | महाराष्ट्रात तब्बल 17,471 पोलीसांची भरती केली जाणार आहे. राज्याच्या वित्त विभागाकडून पोलिसांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे पोलीस दलातील मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील शासन आदेश गृह विभागाने बुधवारी जारी केला.

नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा विचार होता. परंतु आता प्रकाशित नवीन अपडेट नुसार गृहखात्याने थेट पोलीस भरतीला मान्यता दिली आहे. 

सुरक्षा मंडळाच्या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊन कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याने नवीन भरती होईपर्यंत गृह खात्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.

सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका करत कंत्राटी ऐवजी पोलीस भरती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेत, नव्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. वित्त विभागाकडून 100 टक्के पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 17,471 पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस शिपाई, बॅण्डस्मैन पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी पदे यातून भरली जाणार आहेत.

Back to top button