मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात हजारो पदांसाठी मेगाभरती; नोकरी सर्वांसाठी,’या’ठिकाणी करा नोंदणी | Job Fair 2023
मुंबई | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या (Job Fair 2023) माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मुंबई, वाशिम, अहमदनगर, अमरावती, पुणे, हिंगोली, बीड, सांगली, सिंधुदुर्ग याठिकाणी सध्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित आपली नोंदणी Job Fair 2023 या लिंकवर करावी.
Mumbai Job Fair 2023
मुंबई – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे महानगरपालिका शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 177 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
मेळावा जाहिरात – Mumbai Job Fair 2023
Washim Job Fair 2023
वाशिम – वाशीम येथे RMO, पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर (PRO), पिकर आणि पोकर, B.M. B.O.M., B.B.E. बॉब, वॉर्ड बॉय, सफाई कामगर करीता वाशिम महारोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 41 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
मेळाव्याचा पत्ता – आत्मा प्रशिक्षण हॉल जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वाशिम
मेळावा जाहिरात – Washim Job Fair 2023
Ahmednagar Job Fair 2023
अहमदनगर – अहमदनगर येथे ग्राहक सेवा कार्यकारी, अन्न उत्पादन, पिकर आणि पॅकर, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, फिटर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, मशीनिस्ट, टर्नर, फिटर पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याच्या माध्यमातून 535 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. मेळाव्याची तारीख 2 आणि 3 डिसेंबर 2023 आहे.
मेळाव्याचा पत्ता – शासकिय तंत्रनिकेतन, बुरूडगाव रोड, अहमदनगर.
मेळावा जाहिरात – Ahmednagar Job Fair 2023
Amravati Job Fair 2023
अमरावती – अमरावती येथे फील्ड टेक्निशियन, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, विक्री प्रतिनिधी, वॉर्ड-बॉय, परिचर-केअरटेकर, नर्स, प्रशिक्षणार्थी करीता शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा-3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे व संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 685 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
मेळाव्याचा पत्ता – सायन्स कोअर ग्राउंड ,मालटेकडी, अमरावती
मेळावा जाहिरात – Amravati Job Fair 2023
Pune Job Fair 2023
पुणे – पुणे येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 11 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
मेळाव्याचा पत्ता – सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस भवन, 1065 बी, चथुरशिंगी रोड, मॉडेल कॉलनी.
मेळावा जाहिरात – Pune Job Fair 2023
Hingoli Job Fair 2023
हिंगोली – हिंगोली येथे फील्ड एक्झिक्युटिव्ह पदाकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 100 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
मेळाव्याचा पत्ता – सिडको, वाळुज महानगर-1, पाण्याच्या टाकीजवळ, तिसगांव (बजाजनगर), छत्रपती संभाजीनगर
मेळावा जाहिरात – Hingoli Job Fair 2023
Beed Job Fair 2023
बीड – बीड येथे फील्ड एक्झिक्युटिव्ह करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी व खालील संबंधित पत्त्यावर मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे.
मेळाव्याचा पत्ता – सिडको, वाळुज महानगर-1, पाण्याच्या टाकीजवळ, तिसगांव (बजाजनगर), छत्रपती संभाजीनगर
मेळावा जाहिरात – Beed Job Fair 2023
Sangli Job Fair 2023
सांगली | सांगली येथे सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, क्यूए लाइन इन्स्पेक्टर, हेल्पर, मोल्डिंग पर्यवेक्षक, निष्पक्षता, मेकॅनिक, टेलिकॅलर, वॉशिंग बॉय, ऑफिस बॉय पदांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर,सांगली
मेळावा जाहिरात – Sangli Job Fair 2023
Sindhudurg Job Fair 2023
सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग येथे मशीन ऑपरेटर पदांकरीता शासन आपल्या दारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे. तत्पूर्वी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी.
मेळाव्याचा पत्ता – ऑनलाईन
मेळावा जाहिरात – Sindhudurg Job Fair 2023