नवी दिल्ली | सध्या जगभरात कृत्रिम बुद्धीमता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) वापर वाढला आहे. मागील वर्षभरात अनेक दिग्गज कंपन्यांचे अनेक AI टूल्स आणि प्रोजेक्ट समोर आले. Google आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्या AI मध्ये मोठी रक्कम गुंतवत आहेत. गुगलनेही अनेक टूल्स गेल्या वर्षभरात सादर केली होती. आता कंपनीने नवीन वर्षात त्यांचे लेटेस्ट AI मॉडेल LUMIERE सादर केले आहे. हे AI मॉडेल खास करुन क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करण्यासाठी आणण्यात आले आहे. केवळ टेक्सच्या माध्यमातून क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करता येणार असून व्हीडीओ कंटेट निर्मीती क्षेत्रात यामुळे लक्षणिय बदल दिसून येणार आहेत.
Google Introducing Introducing Lumiere AI
जर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर व्हीडीओ बनवायचे असतील तर त्यासाठी आता कॅमेरा घेऊन शूटिंग करण्याची गरज नाही, एडिटिंगची गरज नाही, कारण एआयच्या मदतीने व्हीडीओ क्रिएशन संबधित सर्व कामे तुम्ही आता घरबसल्या करू शकता. LUMIERE AI मॉडेलच्या मदतीने हे काम सोप्या पद्धतीने करता येणार आहे. यासोबतच जर तुमच्याकडे कमी क्वालिटीचे व्हीडीओ असतील तरी तुम्ही अशा व्हिडीओना Lumiere AI एडिटिंगच्या मदतीने High Quality मध्ये बदलू शकता.
गुगलचे LUMIERE AI मॉडेल तुमच्या वेगवेगळ्या कल्पना व्हीडीओच्या रूपात तुमच्या समोर सादर करण्यास तुमची मदत करेल. या टूलच्या मदतीने युझर्स अवघ्या काही मिनिटांत क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करु शकतील. तुम्हाला हवा तो टेक्स दिल्यानंतर अवघ्या काही वेळात व्हिडिओ तुमच्यासाठी तयार होईल. सध्या हे टूल सार्वजनिक झालेले नाही. त्यावर अजून काम सुरु आहे. परंतु लवकरच हे टूल सर्वच युझर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
LUMIERE यासाठी आहे खास
LUMIERE च्या मदतीने तुम्ही टेक्स्ट लिहून व्हिडिओ क्रिएट करु शकता. किंवा इमेज अपलोड करून व्हीडीओ तयार करू शकता. म्हणजेच हे टूल टेक्स्ट टू व्हिडिओ आणि इमेज टू व्हिडिओ तयार करण्यास मदत करेल. तुम्ही LUMIERE ला प्रॉम्प्ट लिहून दिला अथवा इमेज इनपूट दिला तरी या दोन्ही स्थितीत तुम्हाला चांगला क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करून मिळेल. गुगलने याबाबत X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात या नवतंत्रज्ञानाची माहिती दिली आहे.
Google च्या LUMIERE AI मॉडेलला स्पेस-टाईम यू नेट आर्किटेक्चरचा सपोर्ट आहे. व्हिडिओ देण्यासाठी तुम्हाला काही तरी थीम द्यावी लागेल. त्यासंबंधीचा टेक्स्ट द्यावा लागेल. तुम्ही एक हवेत उडणारे फुलपाखरू असा टेक्स्ट दिला तर काही मिनिटातच हवेत उडणाऱ्या फुलपाखराचा व्हिडिओ तयार होईल. अशा वेगवेगळ्या कल्पना तुम्ही Lumiere AI च्या मदतीने प्रत्यक्षात व्हीडीओ रूपात बनवू शकता. हे तयार झालेले व्हीडीओ प्रोफेशनली तसेच वेगवेगळ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अपलोड करून तुम्ही बक्कळ कमाई देखील करू शकता.