Career

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी; आरोग्य सेवा महासंचालनालयात विविध पदांची मोठी भरती सुरु, 487 पदे रिक्त

मुंबई | सरकारी नोकरीचा शोधात असणाऱ्या (Government Job) उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी जाहिरात देखील निघाली आहे.

Directorate General of Health Services Recruitment 2023

या भरतीच्या माध्यमातून ग्रुप B & C (रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर पदांच्या एकूण 487 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

रिक्त पदांचे नाव : ग्रुप B & C (रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर आणि इतर पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/GNM/MSW/इंजीनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 25/27/30/40 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

PDF जाहिरात – Government Jobs 2023
ऑनलाईन अर्ज – MINISTRY OF HEALTH & FAMILY WELFARE RECRUITMENT
अधिकृत वेबसाईट – https://hlldghs.cbtexam.in/Home/index.html

Back to top button