AgricultureGovt. Scheme

‘कृषी सिंचन योजने’ अंतर्गत मिळणार वैयक्तिक शेततळे | Agriculture Irrigation Scheme 

मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनामध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करीत शेततळे अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेततळे या घटकाची महाडीबीटी प्रणालीद्वारे तालुकानिहाय लक्ष्यांक देऊन ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

Agriculture Irrigation Scheme

अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र जमीन असावी व जमीन शेततळे खोदण्यास योग्य असणे आवश्यक आहे. शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर शासकीय योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेले नसावे. शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष ज्या जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे, काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात यावी. पाणलोट क्षेत्रात, टंचाईग्रस्त गावातील लाभ क्षेत्रात घेण्यात यावी.

शेततळ्यासाठी आकारमाननिहाय अनुदान मिळेल. शेततळ्यांकरिता 14,433 ते 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. वैयक्तिक शेततळ्यासाठी विविध आठ प्रकारचे आकारमान दर्शविण्यात आले असले, तरी शेततळ्याचे आकारमान व होणारे खोदकाम यानुसार अनुदान देण्यात येईल.

मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च हा लाभार्थी शेतकऱ्यांना करावा लागेल. जिल्ह्यास एकूण 255 शेततळ्याचे उद्दिष्ट असून, तालुकानिहाय ते निश्‍चित करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahit.gov.in/Farmer/Login या संकेतस्थळावर अर्ज करावे.

Back to top button