Saturday, September 23, 2023
HomeCareer12 वी ते पदवीधरांना जिल्हा परिषद यवतमाळ येथे नोकरीची उत्तम संधी; 60...

12 वी ते पदवीधरांना जिल्हा परिषद यवतमाळ येथे नोकरीची उत्तम संधी; 60 हजार महिना पगार | ZP Yavatmal Bharti 2023

यवतमाळ | यवतमाळ जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (ZP Yavatmal Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दिनांक २३/०६/२०२३ ते दिनांक ०४/०७/२०२३ या कालावधीमध्ये सकाळी १०.०० ते ५.३० वाजता या वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष किंवा पोस्टाव्दारे मागविण्यांत येत आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ही भरती केली जाणार असून जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी करिता राज्य आरोग्य सोसायटी मार्फत प्राप्त मंजूरी नुसार “वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक (NPPCD), दंत आरोग्यतज्ज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, बजेट आणि वित्त अधिकारी, समुपदेशक, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STLS), पॅरामेडिकल वर्कर, फिजिओथेरपिस्ट” पदे भरली जाणार आहेत. (ZP Yavatmal Bharti 2023)

ही पदभरती निव्वळ कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर केली जाणार आहे. अर्ज कार्यालयात प्रत्यक्ष किंवा पोस्टाव्दारे मागविण्यात येत आहे. इच्छूकांनी आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भावे मंगल कार्यालयाजवळ, यवतमाळ- ४४५००१ या पत्त्यावर पाठवावेत.

PDF जाहिरात – https://shorturl.at/ouBSV
अधिकृत वेबसाईटzpyavatmal.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular