Saturday, September 23, 2023
HomeCareerसोलापूर महापालिका & जिल्हा परिषद अंतर्गत लवकरच 1000 रिक्त जागांची भरती |...

सोलापूर महापालिका & जिल्हा परिषद अंतर्गत लवकरच 1000 रिक्त जागांची भरती | ZP Solapur Bharti 2023

सोलापूर | सोलापूर महापालिकेच्या 340 तर जिल्हा परिषदेतील 639 पदांची भरती जुलै अखेरीस होणार आहे. यामध्ये लिपिक, ज्युनिअर अभियंता, ग्रामसेवक अशा विविध पदांचा समावेश आहे.

दुसरीकडे सहकार, महसूल व शिक्षण खात्यातील भरती देखील TCS कंपनीद्वारे केली जाणार आहे. लिपिक पदासाठी मराठी व इंग्रजी टायपिंग बंधनकारक आहे. इतर ‘गट- क’ संवर्गातील पदांसाठी बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचीही साडेसातशे पदांची भरती होणार आहे. मागील सात वर्षांपासून सरकारी नोकर भरतीच्या प्रतीक्षेतील तरुणांना आता पुढील तीन महिन्यांत वेगवेगळ्या शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.


सोलापूर | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सोलापूर जिल्हा परिषदे अंतर्गत विविध विभागांमध्ये लवकरच नोकरीची (ZP Solapur Bharti 2023) संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 17 विभागाअंतर्गत जवळपास नऊशे जागा रिक्त आहेत. त्यात ग्रामसेवकांची 86 तर बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभागातील सेवकांचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात 649 जागा भरण्यास मंजुरी मिळावी म्हणून शासनाला प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात तेवढ्या पदांची भरती जाहीर होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तरूणांनी त्यादृष्टिने तयारी करावी, असे आवाहन त्यांनी ‘सकाळ’ च्या माध्यमातून केले आहे. (ZP Solapur Bharti 2023)

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा या तालुक्यांमध्येच ग्रामसेवकांची सर्वाधिक 72 पदे रिक्त आहेत. त्यानुसार अक्कलकोट 19, बार्शी 26, करमाळा 17, कुर्डुवाडी 10, सांगोला 8, उत्तर सोलापूर 2, पंढरपूर 3, दक्षिण सोलापूर 1, अशी ग्रामसेवकांची एकूण 86 पदे सध्या रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती मागील सहा-सात वर्षांत झालेली नाही. त्यामुळे ‘एक ग्रामसेवक अन् त्यांच्याकडे दोन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार’ अशी वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे. ( Zilla Parishad Solapur Bharti 2023)

45 गावांना नाहीत ग्रामविकास अधिकारी (ZP Solapur Jobs 2023)

जिल्ह्यातील तीन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसाठी स्वतंत्रपणे एक ग्रामविकास अधिकारी देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील 205 गावांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्या गावांचा कारभार सध्या 160 ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सुरु आहे. बार्शी आणि माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 23 पदे रिक्त आहेत. त्या 45 गावांना पूर्णवेळ अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांची भरती कधी होणार, याकडे त्या गावांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular