सांगली | गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली सांगली जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची भरती (ZP Sangli Recruitment 2023) लवकरच होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा परिषदेतील सुमारे 751 जागांच्या भरतीसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा परिषदेतील विविध पदे वर्षानुवर्ष रिक्त आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय व विकासकामांसाठी अडचणी येत आहेत. अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने संबंधितांचा पदभार प्रभारीकडे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागेवर कायम अधिकारी नसल्याने अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. (ZP Sangli Recruitment 2023)
संवर्ग निहाय अंदाजे भरती होणारी आकडेवारी अशी : (ZP Sangli Recruitment 2023)
कंत्राटी ग्रामसेवक – 52 , अंगणवाडी पर्यवेक्षिका – 9, विस्तार अधिकारी (पंचायत) – 1, आरोग्य सेवक (पु.) हंगामी फवारणीमधून – 168, आरोग्य सेवक (पु.) – 17, आरोग्य सेवक (म) – 366, प्रयोगशाळा तंत्रज्ञ -1, आरोग्य पर्यवेक्षक – 4, औषध निर्माण अधिकारी – 23, कनिष्ठ सहाय्यक (लि. ) – 34, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 4, कनिष्ठ अभियंता (जलसंधारण) – 7, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (जलसंधारण) – 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम) – 20, कनिष्ठ अभियंता (बांधकाम) – 3, कनिष्ठ आरेखक (बांधकाम) – 1, कनिष्ठ अभियंता (ग्रापापु) – 23, पशुधन पर्यवेक्षक – 22, विस्तार अधिकारी (कृषी) – 1, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2 अशी एकूण अठरा संवर्गाच्या अंदाजे 751 जागांची भरती होणार आहे.
आयबीपीएस कंपनी घेणार परीक्षा
परीक्षेसाठी मुंबई येथील आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार केलेला आहे. भरतीच्या अनुषंगाने आवश्यकती सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी कोरोनामुळे शासन वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देईल, अशी शक्यता आहे.