लातूर | जिल्हा परिषद लातूर अंतर्गत आरोग्य विभागात विविध रिक्त पदांची भरती (ZP Latur Recruitment 2023) केली जाणार आहे. एकूण 76 रिक्त जागांची भरती केली जाणार असून पदांनुसार पात्र उमेदवरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान ही पदभरती केली जाणार असून “कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट” पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (ZP Latur Recruitment 2023)
या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 असून विहीत मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (ZP Latur Recruitment 2023)
अधिक तपशिलासाठी PDF जाहिरात पहा – https://zp_latur/recruitment.pdf
अधिकृत वेबसाईट – zplatur.gov.in
- पात्र उमेदवारास लेखी किंवा तोंडी परिक्षेसाठी/ मुलाखतीसाठी / कागदपत्र तपासणीसाठी ई मेल द्वारे व जि.प. लातूर च्या वेबसाईटद्वारे कळविण्यात येईल.
- अर्जावर सद्यस्थितीत चालु असलेला ई मेल आयडी व मोबाईल नंबर नोंदवणे बंधनकारक राहिल. संपुर्ण भरती प्रक्रिया होईपर्यंत ई मेल आयडी व मोबाईल नंबर चालु स्थितीत राहण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
- लेखी परीक्षेस अथवा मुलाखतीस आलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास / दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. उमेदवाराने स्वखर्चाने लेखी किंवा मुलाखतीस उपस्थित राहावे.
- अ. क्र. ६ ते 12 पदाकरीता उमेदवार उपलब्ध न झालेस दर महिन्याच्या १ व १५ तारखेला Walk in Interview हे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने घेण्यात येतील. तसेच १ व १५ तारखेला सुटी असलेस पुढील कार्यालयीन दिवशी Walk in Interview घेण्यात येतील. उमेदवारांनी मुलाखतीस येताना मुळ कागदपत्र व एक प्रत झेरॉक्स सोबत घेवून येणे आवश्यक राहील.
- निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार महिना 17 हजार ते 1,70,000 इतका पगार मिळेल.