कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत 728 रिक्त जागांची भरती (ZP Kolhapur Recruitment 2023) केली जाणार आहे. ही नोकर भरती आयबीपीएस कंपनी मार्फत केली जाणार आहे. गेले काही दिवस नोकर भरतीची डेमो लिंक भरण्यात येत होती. त्यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ZP Kolhapur Recruitment 2023 – ऑगस्ट 2023 च्या पहिल्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या 728 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी 2019 मध्ये जाहिरात आली होती. मात्र ही भरती रद्द झाली. त्यानंतर आता 2023 मध्ये भरती होत आहे. त्यामुळे या भरतीकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
या पदभरती अंतर्गत – विस्तार अधिकारी (सांख्यिकी), लघुलेखक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक पुरुष व महिला, विस्तार अधिकारी शिक्षण आदी पदांची भरती केली जाणार आहे.