चंद्रपूर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ‘कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी’ या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. एकूण 81 रिक्त जागांसाठी यासाठी यापूर्वी अर्ज मागवण्यात आले असून मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 2 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ निवासी/वरिष्ठ निवासी –
1. महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषद व भारती आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार.
2. बंधपत्रीत उमेदवारांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल.
3. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिल यांच्याकडे (Valid MMC Registration) नोंदणी आवश्यक.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखत दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या दालनात घेण्यात येईल. मुलाखतीसाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही.