मुंबई | राज्यातील जिल्हा परिषदेतील भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही खुशखबर आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांमधील तब्बल 19460 जागांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. 5 ऑगस्ट 2023 पासून यासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून 25 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे (गट क) सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. एकूण 30 संवर्गांतील 19,460 पदे भरली जाणार आहेत. (ZP Bharti 2023)
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर 5 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट 2023 रोजीचे रात्री 23.59 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती खाली दिलेल्या जिल्हानिहाय लिंक मध्ये उपलब्ध आहे.
रिक्त पदांचा तपशील – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000/- – राखीव वर्ग : 900/-
- वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
जिल्हा परिषद भरतीच्या जिल्हानिहाय लिंक
- जिल्हा परिषद गोंदिया भरती सुरू – ZP Gondia Bharti 2023
- जिल्हा परिषद अमरावती भरती सुरू – ZP Amravati Bharti 2023
- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती सुरू – ZP Sindhudurg Bharti 2023
- जिल्हा परिषद अहमदनगर भरती सुरू – ZP Ahmednagar Bharti 2023
- जिल्हा परिषद हिंगोली भरती सुरू – ZP Hingoli Bharti 2023
- जिल्हा परिषद वाशिम भरती सुरू – ZP Washim Bharti 2023
- जिल्हा परिषद रत्नागिरी भरती सुरू – ZP Ratnagiri Bharti 2023
- जिल्हा परिषद नंदुरबार भरती सुरू – ZP Nandurbar Bharti 2023
- जिल्हा परिषद सांगली भरती सुरू – ZP Sangli Bharti 2023
- जिल्हा परिषद जळगाव भरती सुरू – ZP Jalgaon Bharti 2023
- जिल्हा परिषद नांदेड भरती सुरू – ZP Nanded Bharti 2023
- जिल्हा परिषद कोल्हापूर भरती सुरू – ZP Kolhapur Bharti 2023
- जिल्हा परिषद वर्धा भरती सुरू – ZP Wardha Bharti 2023
- जिल्हा परिषद भंडारा भरती सुरू – ZP Bhandara Bharti 2023
- जिल्हा परिषद सोलापूर भरती सूरू – ZP Solapur Bharti 2023
- जिल्हा परिषद औरंगाबाद भरती सूरू – ZP Aurangabad Bharti 2023
- जिल्हा परिषद पुणे भरती सूरू – ZP Pune Bharti 2023
- जिल्हा परिषद नागपूर भरती सूरू – ZP Nagpur Bharti 2023
- जिल्हा परिषद पालघर भरती सुरू – ZP Palghar Bharti 2023
- जिल्हा परिषद नाशिक भरती सुरू – ZP Nashik Bharti 2023
- जिल्हा परिषद लातूर भरती सूरू – ZP Latur Bharti 2023
- जिल्हा परिषद जालना भरती सुरू – ZP Jalna Bharti 2023
- जिल्हा परिषद गडचिरोली भरती सुरू – ZP Gadchiroli Bharti 2023
- जिल्हा परिषद चंद्रपूर भरती सुरू – ZP Chandrapur Bharti 2023
- जिल्हा परिषद यवतमाळ भरती सुरू – ZP Yavatmal Bharti 2023
- जिल्हा परिषद अकोला भरती सुरू – ZP Akola Bharti 2023
- जिल्हा परिषद ठाणे भरती सुूरू – ZP Thane Bharti 2023
- जिल्हा परिषद बुलढाणा भरती सुरू – ZP Buldhana Bharti 2023
- जिल्हा परिषद उस्मानाबाद भरती सुरू – ZP Osmanabad Bharti 2023
- जिल्हा परिषद रायगड भरती सुरू – ZP Raigad Bharti 2023
- जिल्हा परिषद बीड भरती सुरू – ZP Beed Bharti 2023
- जिल्हा परिषद धुळे भरती सुरू – ZP Dhule Bharti 2023
- जिल्हा परिषद परभणी भरती सुरू – ZP Parbhani Bharti 2023
परिक्षेसाठी IBPS एजन्सीची निवड
IBPS एजन्सी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेने ‘आयबीपीएस’ ही एजन्सी नियुक्त केली आहे. शासनाने संवर्गनिहाय परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित केल्याने आता परीक्षेचा पेपर काढणे आणि पेपरतपासणी तसेच अनुषंगिक कार्यवाही या एजन्सीमार्फत होऊन भरतीप्रक्रिया पार पडेल.
प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा स्वतंत्र दिवशी घेतली जाईल. यामध्ये संवर्गनिहाय मराठी, इंग्रजी संबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान, बुद्धिमापक आणि गणिताचे प्रश्न, तांत्रिक प्रश्न, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, काठिण्य पातळी आणि परीक्षेची वेळ निश्चित केली जाणार आहे.