Saturday, September 23, 2023
HomeCareerबीड जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त जागांची भरती | ZP Beed Bharti 2023 

बीड जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त जागांची भरती | ZP Beed Bharti 2023 

बीड | जिल्हा परिषद बीड अंतर्गत रिक्त जागांची भरती (ZP Beed Bharti 2023) केली जात आहे. याठिकाणी ‘विधिज्ञ’ पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड आहे.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

PDF जाहिरातZP Beed Notification 2023
अधिकृत वेबसाईटzpbeed.gov.in


बीड जिल्हा परिषद अंतर्गत 568 रिक्त जागांची भरती | ZP Beed Bharti 2023

बीड | जिल्हा परिषद बीड आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी (ZP Beed Bharti 2023) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 568 रिक्त पदे जिल्हा परिषद बीडच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत.

ZP Beed Bharti 2023 – गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) ही पदे भरण्यात येणार आहेत.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा.

उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे.

  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. 1000/-  राखीव वर्ग – 900/-
  • वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

PDF जाहिरात – ZP Beed Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – https://ibpsonline.ibp
अधिकृत वेबसाईट – https://zpbeed.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular