मुंबई | राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील गट ‘क’ मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजारांवरील पदे आता भरली जाणार आहेत. (ZP Amravati Recruitment 2023)
या भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार केला जाणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेत तब्बल 653 पदे भरली जाणार आहेत. कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. (ZP Amravati Recruitment 2023)
त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही रिक्त पदे 15ऑगस्टपूर्वी भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
जिल्हा परिषद, अंतर्गत गट – क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट – ड संवर्गातील पदे वगळून ) विविध विभागाकडील सरळसेवने भरावयाची रिक्त पदे या पदभरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांना 5 ॲागस्ट 2023 पासून अर्ज करता येणार आहेत तर 25 ॲागस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
PDF जाहिरात – ZillaParishad Amravti Bharti 2023