जळगाव | राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील रिक्त पदांवर लवकर भरती होणार असून जळगाव जिल्हा परिषद येथे 619 जागासाठी भरती होणार आहे. जळगाव जिल्हा परिषदेमार्फत एकूण 619 जागांवर भरती होणार आहे. (Jalgaon Zilla Parishad Bharti 2023)
वर्ग तीनच्या विविध जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. सरळसेवेतून ऑनलाइन परीक्षा होऊन आयबीपीएस कंपनीला परीक्षेचे कार्य देण्यात आले आहे. राज्यभरातील भरतीचे नियंत्रण पुणे जिल्हा परिषद अंतर्गत केले जाणार आहे. (Jalgaon Zilla Parishad Bharti 2023)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहे. (Jalgaon Zilla Parishad Bharti 2023)
त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत गट क मध्ये 16 संवर्गातील अंदाजीत 612 पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.