2 वर्षांसाठी YouTube Premium Free! मुकेश अंबानींचं Jio युजर्सना खास गिफ्ट

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जिओ युजर्ससाठी खास गिफ्टची घोषणा केली आहे. जिओ फायबर आणि जिओएअरफायबर युजर्सना आता २ वर्षांसाठी YouTube Premium Free मिळणार आहे.

YouTube Premium म्हणजे काय?
YouTube Premium हे सशुल्क सब्सक्रिप्शन आहे, ज्यासाठी ग्राहकांना दर महिन्याला १४९ रुपये मोजावे लागतात. या सेवेअंतर्गत जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहणे, व्हिडिओ डाउनलोड करणे, बॅकग्राउंडमध्ये म्यूझिक ऐकणे, आणि YouTube Music Premium वर १०० मिलियनहून अधिक गाणी ऐकण्याची सुविधा मिळते.

किंमती वाचवणारी ऑफर – YouTube Premium Free
जिओच्या या खास ऑफरमुळे ग्राहकांचे दोन वर्षांत अंदाजे ३६०० रुपये वाचतील.

कोणत्या प्लॅन्सवर मिळणार ऑफर?
ही ऑफर जिओ फायबर आणि जिओएअरफायबरच्या ८८८ रुपये, ११९९ रुपये, १४९९ रुपये, २४९९ रुपये आणि ३४९९ रुपयांच्या प्लॅन्सवर लागू आहे.

असे करा ऑफर अॅक्टिव्हेट

  • MyJio अॅप उघडा.
  • YouTube Premium चा बॅनर शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आपल्या YouTube अकाउंटने लॉग इन करा.

ही सुविधा जिओ सेट-टॉप बॉक्ससह इतर सर्व डिव्हाइसवरही वापरता येईल.

ऑफरची सुरुवात
११ जानेवारीपासून या ऑफरची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिओच्या या निर्णयामुळे युजर्सना प्रिमियम मनोरंजनाचा आनंद मोफत घेता येणार आहे.