3 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग; Xiaomi ची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये | Xiaomi SU7
बेंगलुरु | शाओमीने मंगळवारी भारतात मोठा धमाका केला. कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार, Xiaomi SU7, अधिकृतपणे भारतात सादर केली. 265 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि केवळ 2.78 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग घेण्याची क्षमता असलेली ही कार भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणारी एक प्रभावी स्पर्धक ठरली आहे.
कारच्या लाँचिंगला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 24 तासांच्या आत, कंपनीला 90,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाली आहेत. भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांसाठी किती उत्सुक आहेत आणि Xiaomi SU7 सारख्या अत्याधुनिक आणि कार्यक्षम कारला स्वीकारण्यास तयार आहेत हे यावरून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.
Xiaomi SU7 ची वैशिष्ट्ये:
- 265 किलोमीटर प्रति तास अधिकतम वेग
- 3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग
- एका चार्जवर 800 किलोमीटरपर्यंतची रेंज
- अत्याधुनिक स्वायत्त ड्रायव्हिंग तंत्रज्ञान
- लक्झरी इंटीरियर आणि प्रगत सुविधा
शाओमीच्या या इलेक्ट्रिक SUV मध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये सर्वात मोठे फीचर हे आहे की कार एकदा चार्ज केल्यावर 800 किलोमीटरपर्यंत धावते. इतकेच नाही तर 0-100 किलोमीटरचा वेग पकडण्यासाठी या कारला केवळ 2.78 सेकंदाचा वेळ लागतो. कारची Power 673 PS इतकी आहे. तर या कारचा टॉर्क 838 Nm इतका आहे. Xiaomi SUV 7 एक फोर डोअर EV सेडान कार आहे. कारची लांबी 4997 mm, रुंदी 1963 mm आणि इंची 1455 mm इतकी आहे. या कारमध्ये सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये 73.6 kwh ची बॅटरी तर टॉप व्हेरिएंटमध्ये 101kWh बॅटरी आहे.
शाओमीच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये इंडिविज्युअल ड्राईव्ह मोड आहे. शाओमी स्मार्ट चेसिसवर तयार करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने यामध्ये एकदम खास ब्रेकिंग सिस्टिम तयार केली आहे. या कारमध्ये 838NMचा किमान टॉर्क मिळतो. तर यामध्ये 673PS ची कमाल शक्ती मिळते.
Xiaomi SU7 कारची किंमत किती?
चीनमध्ये या कारची किंमत 2,15,900 ते 2,99,900 युआन म्हणजे भारतीय चलनात सुमारे 25,04,656 ते 33,39,600 रुपयांच्या दरम्यान आहे. या कारची लांबी 4997 मिमी, रुंदी 1963 मिमी, उंची 1455 मिमी तर व्हीलबेस 3000 मिमी आहे. यामध्ये विविध व्हील साईजचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार कारची किंमत कमी जास्त होऊ शकते. कंपनीने भारतात ही कार सादर केली असली तरी ही कार भारतात विक्री केली जाणार का याबाबत अद्याप अधिकृत सांगण्यात आलेलं नाही.