सातारा | जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यात (WRD Satara Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे केली जाणार आहे.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज विहित कालावधीत सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – WRD Satara Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/