News

ग्रामीण विकासासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन | Workshop for rural development

ग्रामीण विकासाच्या आव्हानांवर सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि समाजात पर्यावरण, आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन (Workshop for rural development) करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो, यावर चर्चा करणे आहे. मात्र, या योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्थानिक परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या समस्यांचा आढावा घेणे ही या उपक्रमाची मध्यवर्ती कल्पना आहे.

कार्यशाळेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ग्रामीण विकासात कार्यरत मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, या क्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या तज्ञांनाही मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, ग्रामविकासासाठी इच्छुक प्रायोजकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी: प्रभाकर पाटील – 9158185300
आयोजक – ‘आमचा गाव, आमचा विकास मीडिया’ आणि ‘शाश्वत फाउंडेशन’
दिनांक : 16 जानेवारी 2025
वेळ : दुपारी 12:00 ते 3:00
ठिकाण – डी.के. शिंदे समाजकार्य विभाग, सायबर कॉलेज, कोल्हापूर.

संवादक –

मा. प्राचार्य अर्जुन आबिटकर
प्राचार्य ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर गारगोटी
मा.जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर

मा.जितेंद्र भोसले
जितेंद्रराजे ज्ञानू भोसले
प्रदेशाध्यक्ष: सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य तथा प्रथम मा.लोकनियुक्त सरपंच नागझरी

अधिष्ठाता. डॉ. सोनिया रजपूत
अधिष्ठाता. डी.के.शिंदे समाजकार्य विभाग ,
सायबर कॉलेज कोल्हापूर

मा.राणीताई पाटील
अध्यक्षा : महिला सरपंच आघाडी महाराष्ट्र

मा.सागर माने
मा. लोकनियुक्त सरपंच जाखले तालुका पन्हाळा
युवा उद्योजक

मा.निलेश व्यवहारे
युवा उद्योजग आणि पाणी फाउंडेशन समन्वयक

मा.शिवाजीराव मोरे (आप्पा)
मा. जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर

प्रा. डॉ. दुर्गेश वळवी
डी. के. शिंदे समाजकार्य विभाग, सायबर इन्स्टिट्यूट कोल्हापूर

Back to top button