News

कोल्हापुरात ११ व १२ जानेवारी रोजी वर्डकॅम्पचे आयोजन; सहभागी होण्यासाठी लगेच दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. | WordCamp Kolhapur 2025

कोल्हापूर | वर्डप्रेस तंत्रज्ञान प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. कोल्हापुरात पहिल्यांदाच वर्डकॅम्पचे आयोजन (WordCamp Kolhapur 2025) करण्यात आले आहे. दिनांक ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, येथे हा कँप होणार आहे.

वर्डकॅम्प म्हणजे वर्डप्रेसशी जोडलेल्या लोकांसाठी ज्ञान, कल्पना आणि अनुभव शेअर करण्याचे व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात तंत्रज्ञानातील नवशिके, विद्यार्थी, व्यावसायिक आणि तज्ञांना वर्डप्रेसबद्दल अधिकाधिक शिकण्याची व एकमेकांशी जोडण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण

  • ज्ञान सत्रं: वर्डप्रेसवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कार्यशाळा आणि चर्चासत्रं.
  • नेटवर्किंगची संधी: तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक लोकांशी भेट व चर्चा.
  • प्रेरणादायी वक्ते: वर्डप्रेस तज्ञांकडून विकास, डिजिटल मार्केटिंग व अन्य विषयांवर अनुभव व माहिती.
  • कोल्हापूरचा अनुभव: शहराच्या सांस्कृतिक वारशाचा आनंद घेत, शिकण्याचा दुहेरी अनुभव.

वर्डकॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी विविध पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहेत.

Back to top button