‘जगातील सर्वात सुंदर महिला’ असा लौकिक लाभलेली जीना लोलोब्रिगिडा कोण होती? जी मृत्यूनंतर 45 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती सोडून गेली | Gina Lollobrigida

मुंबई | जीना लोलोब्रिगिडाला विसाव्या शतकातली मोनालिसा असं म्हटलं जात होतं. वयाच्या 95 व्या वर्षी म्हणजेच 17 जानेवारी 2023 रोजी तिचा मृत्यू झाला. जीनाच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठं दुख: झालयं. खालील वेबस्टोरीजच्या माध्यमातून जाणून घेऊया जीना लोलोब्रिगिडाच्या जिवनाविषयी..

हिंदी सिनेमातही झळकली होती जीना लोलोब्रिगिडा?

१९७८ मध्ये शालीमार नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमात जीना झळकणार होती. या सिनेमात धर्मेंद्र, झीनत अमान, शम्मी कपूर, रेक्स हॅरिसन, जॉन सेक्सन आणि जीना असे कलाकार होते. जीना लोलोब्रिगिडा सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळी मुंबईला आलो होती. धर्मेंद्र, जीना लोलोब्रिगिडा आणि झीनत अमान यांचे फोटोही तेव्हा छापून आले होते. त्यानंतर सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं पण जीना लोलोब्रिगिडा कुठेही दिसली नाही. त्यावेळी अशा अफवा पिकल्या होत्या की धर्मेंद्र आणि जीना यांच्यात वाद झाले आहेत. मात्र धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितलं की शालीमार या सिनेमात सुरूवातीला जीनाच असणार होती. पण आम्ही सिल्विया माइल्सला सिनेमात घेतलं.