Republic Day
२६ जानेवारी २०२३ रोजी भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय.
भारतीयांसाठी हा दिवस खास असल्याने दरवर्षी राजधानी दिल्ली मध्ये इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवन पर्यंत राजपथावर परेड आणि रॅलीचं आयोजन केलं जातं.
आजपासून 73 वर्षांपूर्वी म्हणजे 1950 साली 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी देशामध्ये संविधान लागू झालं.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा.
26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमनियन स्टेटचा दर्जा द्यावा आणि याच दिवशी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी इंग्रजांकडे करण्यात आली होती.
पूर्ण स्वराज्याची मागणी केल्यानंतर स्वांतत्र्य मिळाल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं.
26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्यापासून आपले राष्ट्र खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राष्ट्र बनले, त्यामुळे या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणतात.
भारताचं संविधान डॉक्टर भीमराव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलं आहे.
संविधान बनवणाऱ्या कमिटीमध्ये एकूण 308 सदस्य होते. त्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी संविधानला कायदा म्हणून मंजूरी दिली.
यंदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून (23 जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकारी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.