धीरेंद्र शास्त्री उर्फ ​​बाबा बागेश्वर आजकाल आपल्या चमत्कारिक शक्तीच्या दाव्यांमुळे चर्चेत आला आहे.

धीरेंद्र शास्त्रीच वय अवघं २६ वर्षे असून त्याचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर गढा गावात झाला आहे. 

बागेश्वर बाबाला एक लहान भाऊ असून त्याचं नाव सालिग, बहिणीचं नाव रीटा तर वडिलांचं नाव रामकृपाल  आणि आईचं नाव सरोज गर्ग आहे.

धीरेंद्र शास्त्रीच्या वडीलांचा घरी दुध विक्रीचा व्यवसाय असून आई दूध विक्रीचं काम करते, त्याचं बालपण गरिबीत गेलं असं म्हणतात.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने गंज गावातून हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतल असून बीएची पदवी मिळवली आहे. 

धीरेंद्र शास्त्रीचे आजोबा सिद्ध पुरुष होते असे म्हणतात, ते गावातील हनुमानच्या मंदिरात दर मंगळवार शनिवारी ते दरबार भरवत असत. 

आपल्या आजोबांना गुरू मानणारा धिरेंद्र शास्त्री वयाच्या नवव्या वर्षापासून आजोबांसोबत मंदिरात जात होता तेव्हाच तो  आजोबांकडून रामकथा वाचायला शिकला.

बागेश्वर सरकारचा दावा आहे की त्याला जनतेच्या मनातील गोष्टी माहित आहेत. तो कोणाला न सांगता त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय लिहून ठेवतो.

बागेश्वर बाबा अचानक त्या व्यक्तीला समोर बोलावून त्यांची समस्या सांगतो, जी त्याने आधीच कागदावर लिहून ठेवली असते. लोकही ते खरे असल्याचे मान्य करतात.

दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या धीरेंद्र महाराजाला अंनिसच्या श्याम मानव यांनी आव्हान दिलं असून त्यांच्याकडे असणारी दिव्यशक्ती सर्वांसमोर दाखवा असं सांगितलं आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री अंनिसच्या आव्हानानंतर नागपूर येथील कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेल्यानं या प्रकरणाची खूपच चर्चा रंगली.

विशेष म्हणजे बागेश्वर बाबा याने एका अटीवर हे आव्हान स्वीकारलं असून नागपूरला येऊन चमत्कार दाखवणार नाही तर श्याम मानव यांना रायपूरला बोलावलं आहे.

बागेश्वर बाबाच्या मंदिरात भाजपच्या बड्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली असून त्याचा चरणावर डोकं ठेवलं आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेल्या नागपूरच्या याच 'दिव्यदरबारा'तून बागेश्लर बाबाने पळ काढला होता. 

अंनिसच्या आव्हानानंतर बागेश्वर बाबाची देशात जोरदार चर्चा सुरू असून त्याच्या दरबारातील गर्दी मात्र वाढू लागली आहे.

अशाच बेगवेगळ्या बेवस्टोरीज पाहण्यासाठी लोकशाही न्यूज सोबत कनेक्ट राहा. 

UA-140389754-1