छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे याचा जगभरातल्या वेगवेगळ्या वस्तुसंग्रहलायात असणाऱ्या चित्रांचा संदर्भातून अंदाज येतो

1845 साली फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये प्रकाशित झालेलं शिवाजी महाराजांचं एक चित्र

शिवाजी महाराजांचं खरंखुरं विश्वासार्ह चित्र शोधून काढण्याचं श्रेय इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांना दिलं जातं. हे चित्र डच दस्तावेजांचा अभ्यास करताना त्यांना सापडलं.

गोवळकोंडा भेटीदरम्यान कुतुबशहाच्या दरबारातील चित्रकारानं राजांचं चित्र रेखाटलं होतंत्यातलंच हे व्यक्तीचित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयातही पाहायला मिळतं

''शिवाजी महाराज पाच फूट चार इंच उंचीचे होते. त्यांचं नाक बाकदार होतं. भव्य कपाळ होतं. त्यांचे डोळे बाणेदार होते. चेहऱ्याची उभी ठेवण होती.

जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालायत मिळालेल्या चित्रात शिवाजी महाराजांच्या हातात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार दाखवण्यात आली आहे

अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा या शस्त्राबरोबरच कमरेला कट्यार लावल्याचे दिसून येत आहे.

पॅरिस येथील खासगी वस्तुसंग्रहालयातील चित्रात महाराजांच्या हातात पट्टा शस्त्र दाखविण्यात आले आहे

हे चित्र लंडन येथील बॉनहॅन्स कलेक्शन येथे आहे. चित्रातील शैली किशनगड येथील चित्रशाळेतील असून चित्रकार निहालचंद यांनी हे चित्र काढल्याचा अंदाज आहे.

छत्रपती शिवरायांचे हे चित्र बडोदा संस्थानच्या संग्रहालयात आहे. राजपूत-मुघल शैलीत हे चित्र असल्याचे अभ्यासक सांगतात. १८ व्या शतकात हे चित्र काढण्यात आले. 

१७८२ साली प्रसिद्ध झालेल्या रॉबर्ट आर्म ह्यांच्या ‘historical fragments’ ह्या पुस्तकात शिवरायांच हे चित्र छापण्यात आले होते.

हॉलंड येथील रिक्स म्युझियम येथील संग्रहालयात शिवाजी महाराजांचे हे चित्र आहे. इसवी सन १६८० मध्ये हे चित्र रेखाटल्याची नोंद आहे.

हे चित्र देखील हॉलंडच्या रिक्स म्युझियमध्ये आहे. १६७५-१६८५ असा ह्या चित्राचा कालखंड मानला जातो. ह्या चित्रावर ‘Siwagii prince in decam’ असे लिहलेले आहे.

जर्मनी येथील बर्लिन स्टेट लायब्ररी मध्ये हे चित्र ठेवलेले आहे. ‘Siuwagie gewerzere maratise vorst’   असे या चित्रावर लिहिलेले असून ह्याचा अर्थमराठ्यांचा राजाअसा होतो.

छत्रपती शिवरायांचा संपुर्ण चेहरा दिसणारे हे चित्र फ्रान्समधील गिने संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. संपूर्ण चेहरा दिसणारे हे चित्र त्यामुळेच दुर्मिळ आहे.

छत्रपती शिवरायांचे हे चित्र आपण बऱ्याचदा पाहीले असेल. सध्या हे चित्र लंडनच्या ‘Potraits of Indian princes’ ह्या चित्रसंग्रहात ठेवण्यात आले आहे.

जयपूरच्या पोथीखान्यातील हे चित्र १८ व्या शतकातील आहे. अंबर घराण्याचा वैयक्तिक दप्तर म्हणून जयपूरचा पोथीखाना ओळखला जातो. हे चित्र वेगळ्या धाटणीचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील ही माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका..!
हर हर महादेव..!

UA-140389754-1