भारतात गाड्यांसाठी 8 प्रकारच्या रंगांतील नंबरप्लेट वापरल्या जातात. प्रत्येक रंगाच्या नंबरप्लेटच्या वाहनाचा वेगवेगळ्या उद्देशासाठी वापर केला जातो.
वाहनांचे नंबरप्लेट वेगवेगळ्या रंगांचे का असतात? जाणून घ्या कारण
खासगी वापरासाठी असलेल्या वाहनांवर पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर केला जातो. याचा अर्थ ती कार तुमच्या वैयक्तिक वापरासाठी तुम्ही घेतली आहे
पांढरी नंबर प्लेट
सार्वजनिक वाहतूकीच्या वाहनांवर पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेट लावल्या जातात. यामध्ये बस, टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा, बाईक टॅक्सीचा समावेश होतो.
पिवळी नंबर प्लेट
काळ्या रंगातील प्लेटवर पिवळ्या नंबरच्या गाड्या या व्यवसायिक तत्वावर परंतु खास व्यक्तींसाठी वापरल्या जातात. जसे की झूम कार वगैरे.
पिवळी काळी नंबर प्लेट
लाल रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या कार फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल वापरु शकतात. नंबरप्लेटवर क्रमांकाऐवजी अशोक चिन्ह असते.
लाल नंबर प्लेट
भारतात निळ्या रंगाची नंबर प्लेट असलेली कार देशात येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींसाठी वापरतात. यातून परदेशी राजदूत किंवा मुत्सद्दी प्रवास करतात.
निळी नंबर प्लेट
भारतात लष्करी वाहनांसाठी नंबरप्लेट असून नंबरप्लेटवर पहिल्या किंवा तिसऱ्या अंकाच्याजागी वरच्या दिशेने दाखविलेला बाण असतो.
निळी नंबर प्लेट
वाहन निर्मात्याकडून चाचणी किंवा प्रमोशनसाठी रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर लाल-पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट वापरल्या जातात.
लाल- पांढरी नंबर प्लेट
भारतात सध्या हिरव्या नंबर प्लेट असलेली वाहने दिसत असून, हिरव्या नंबर प्लेटचा वापर फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी केला जातो.
लाल- पांढरी नंबर प्लेट
शेअर करायला विसरू नका आणि अशा वेगवेगळ्या माहितीपूर्ण वेबस्टोरी पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा!
तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास...