केंद्र सरकारने पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने आता पॅन वापरकर्त्यांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदत दिली आहे. 

करदात्यांच्या समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने पॅन आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवून दिली आहे. 

यापूर्वी 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत प्राप्तिकर विभागाने दिली होती. सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात करदात्यांना दिलासा मिळाला आहे.