थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांना गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून नवीन जीवन दिले
शाहू महाराजांनी जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेती विकास, धरणे, रस्ते अशा विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली
शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते.
शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. 17 मार्च 1884 रोजी त्यांचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. दत्तकविधानानंतर त्यांचे ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले.
राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.
सन 1907 मध्ये शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ या नावाचे वसतिगृह उघडले
21 नोव्हेंबर 1917 रोजी काढलेल्या जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले.
सन 1917 मध्येच शाहू महाराजांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळून दिली.
शाहूनी महाराजांनी संस्थानातील महार वतने रद्द करून जमीनी अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या. अस्पृश्यांकडून वेठबिगारी पद्धतीने कामे करून घेण्यास कायद्याने बंदी घातली.
1918 साली छत्रपती शाहूंनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले
1918 साली शाहूंनी वतनदारांच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी खेड्यातील कुलकर्णी वतने रद्द करून त्या जागी पगारी तलाठी नेमण्याची व्यवस्था केली.
1919 साली शाहूराजांनी बलुतेदार पद्धत बंद करण्याविषयीच्या कायद्याचा भंग करणाऱ्याला 100 रु. दंड व चार दिवसांची कारावासाची शिक्षा देणारा कायदा केला.
शाहू महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर सन 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे 6 मे 1922 रोजी या महान राजाचे निधन झाले.