News

Weather Update 1 July 2024 : पुढील 10 तास राज्यात अतिमुसळधार पाऊस; \’या\’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुणे | हवामान विभागाने वर्तवलेल्या (Weather Update 1 July 2024) अंदाजानुसार, आज पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाट परिसरात देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पुण्याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ आणि अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मुंबई व्यतिरिक्त विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापैकी अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Back to top button