News

सावधान! शाहूवाडी तालुक्यातील \’या\’ धबधब्यांवर पर्यटनासाठी बंदी, चुकून गेलाच तर होईल फौजदारी गुन्हा दाखल | Waterfalls in Shahuwadi taluka banned for tourism

पुणे येथील लोणावळा भूशी डॅम धरणाच्या प्रवाहात पाच पर्यटक वाहून गेले. काळम्मावाडी येथे दोन तरूण बुडून मृत्युमुखी पडले. अशा अनेक घटना वर्षा पर्यटना दरम्यान घडत आहेत.

शाहूवाडी | वर्षा पर्यटनाच्या दरम्यान राज्यातील वाढत्या अपघाताच्या घटना ध्यानात घेत शाहूवाडी तालुक्यातील पाच पर्यटन स्थळांवरील धबधब्यावर (Waterfalls in Shahuwadi) जाण्यास पर्यटकांना बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या पाच पर्यटन स्थळावर 144 कलम लागू केल्याची माहिती शाहूवाडीचे न्याय दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी दिली आहे.

सध्या शाहूवाडी तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. डोंगर कपारीतील लहान मोठे धबधबे मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. पावसाळी पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटक येत आहेत. मात्र अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्याने तसेच इतर कारणांनी अशा ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत.

जोरदार पावसामुळे धरण धबधबे यांचा  पाण्याचा प्रवाह वाढत आहेत. त्यामुळे पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी शाहूवाडीचे न्याय दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी कांडवन, केर्ले धबधबा, पावनखिंड, मानोली धरण, उखळू धबधबा या पाच पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी आदेश लागू केला असल्याचे सांगितले आहे. 

आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व नागरीक यांना हा आदेश लागू होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन तहसिल कार्यालयातून करण्यात आले आहे.

Back to top button