News

Hello Kolhapur च्या बातमीवर शिक्कामोर्तब: वाल्मिक कराड पुणे सीआयडीच्या ताब्यात | Walmik Karad

राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडला पुणे सीआयडीने ताब्यात घेतले आहे. या संदर्भातील वृत्त Hello Kolapur वेबपोर्टलने सर्वात आधी प्रकाशित केले होते. अखेर या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Walmik Karad । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये सीआयडीच्या 9 टीम कार्यरत आहे. या प्रकरणी सर्व आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले असून संपत्ती जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली. अशातच आता या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. 30 डिसेंबर रोजी रात्री 12.55 Am वाजता ‘हॅलो कोल्हापूर’ या वेबपोर्टलने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. अखेर या वेबपोर्टलच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आरोपी वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी CID प्रयत्न करत होती. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. अशातच नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलमध्ये देखील वाल्मिक कराडने काहीजणांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. अशातच आता CID ला वाल्मिक कराडला पकडण्यात मोठं यश आले आहे.

https://hellokolhapur.com/breaking-news-walmik-karad-arrested-from-pune/
Back to top button