Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा

भाजप १२८ जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट ५४ आणि अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

Vidhan Sabha Election Results 2024 : विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होत आहेत. निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार आत्तापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे

  1. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे पराभव झाला आहे.

  2. ठाण्याच्या पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत.
  3. नागपूर द. प. मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या प्रफुल गुडधे यांचा पराभव झाला आहे.
  4. पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा पराभव झाला आहे.
  5. जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे.
  6. सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झाला आहे.
  7. मुंबईच्या वडाळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव पराभूत झाल्या आहेत.
  8. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला आहे.
  9. मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांचा पराभव झाला आहे.
  10. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या रवी राणा यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुनिल खराटे यांचा पराभव झाला आहे.
  11. पुणे जिल्ह्यातील कोथरुड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झाला आहे.
  12. नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव झाला आहे.
  13. बीडच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे.
  14. साताऱ्यातून भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव झाला आहे.
  15. पुण्याच्या कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे.
  16. सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैभव पाटील यांचा पराभव झाला आहे.
  17. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या अमल महाडीक यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे.
  18. इस्लामपूर मतदारसंघ – विजयी उमेदवार – जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  19. कांदिवली पूर्व मतदारसंघ – विजयी उमेदवार – अतुल भातखळकर (भाजप)
  20. मालेगाव बाह्य मतदारसंघ – विजयी उमेदवार – दादाजी भुसे (शिवसेना शिंदे गट)
  21. वांद्रे पश्चिम मतदारसंघ – विजयी उमेदवार – आशिष शेलार (भाजप)
  22. कुलाबा मतदार संघातून राहूल नार्वेकर विजयी
  23. बारामती विधानसभा मतदार संघात अजित पवार यांनी गड राखला असून ते विजयी झालेत. त्यांनी आपले पुतणे युगेंद्र पवार यांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.
  24. अंधेरी पूर्व मधून महायुतीचे मुरजी पटेल विजयी. त्यांनी महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके यांचा पराभव केला.
  25. अकोला विधानसभा मतदार संघातून महायुतीचे रणधीर सावरकर विजयी झाले. त्यानी महाविकास आघाडीच्या गोपाळ दातकर यांचा पराभव केला आहे.
  26. बुलढाणा मतदार संघात महायुतीचे संजय बनसोडे विजयी झालेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांचा पराभव केला.
  27. रावेर मतदार संघात