News

स्वस्तात खरेदीची संधी: कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अटकावून ठेवलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव | Vehicles e auction

कोल्हापूर | प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकाने विविध गुन्ह्यामध्ये अटकावुन ठेवलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव (Vehicles e auction) करण्यात येणार आहे. या वाहनांचा लिलाव 17 सप्टेंबर 2024 रोजी केला जाणार आहे. वाहन मालक प्रतिसाद देत नसल्याने या वाहनांचा ई लिलाव महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 नुसार शासकीय महसुलापोटी करण्यात येत आहे.

मोटार वाहन कायदा 1988 च्या विविध कलमांतर्गत व मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकीत असलेली 115 वाहने संभाजी नगर एस. टी. डेपो मध्ये अटकावून ठेवली आहेत. या वाहनांचा गुरुवार, दि. 17 सप्टेंबर 2024 रोजी ई-लिलाव करण्यात येणार आहे. वाहनमालक व वित्तधारकांनी दि. 20 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधुन आपल्या वाहनांवरील खटला विभागातील दंड व थकीत कर व्याजासह भरुन आपल्या ताब्यात घ्यावीत अन्यथा आपली वाहने ई-लिलावाद्वारे विकली जातील. यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य मानली जाणार नाही, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकरी विजय चव्हाण यांनी केले आहे.

गेले अनेक वर्षापासुन ही वाहने थकीत कर व खटला विभागातील दंड न भरल्यामुळे संभाजी नगर एस. टी. डेपो येथे बरीच वर्षापासून पडून आहेत. वाहन मालकांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयाशी आज पर्यंत संपर्क साधलेला नसुन व वाहन मालक प्रतिसाद देत नसल्याने या वाहनांचा ई लिलाव महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 नुसार शासकीय महसुलापोटी करण्यात येत आहे.

कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर वाहन क्रमांकासह यादी नमुद केली आहे. वाहन मालकांना नोंदणीकृत पत्त्यावर नोटीस पाठवली असता नोंदणीकृत वाहन मालक आढळून येत नाही. वाहन मालकांना नमुना-1 करमागणी नोटीस, नमुना-2 तगादा नोटीस, नमुना-3अंतिम तगादा नोटीस त्यांच्या मुळ नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली असता वाहन मालक आढळुन येत नाही तसेच कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा शेरा पोस्ट ऑफिसकडून मिळाला असून नोटीस परत आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधुन अपल्या वाहनाचा थकीत कर व्याजासह व खटला विभागातील केसेसचा दंड भरुन वाहन आपल्या ताब्यात घ्यावे अन्यथा सरकारी महसुलापोटी वाहनाचा ई-लिलाव करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

लिलाव प्रक्रिया
ई लिलाव अर्ज करताना डीजिटल सिग्नेचर असणे आवश्यक आहे. तसेच शासकीय अटी, शर्ती व नियमांच्या आधिन राहुन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. अर्जदाराने एक लाख पन्नास हजारांची अनामत रक्कम व शासकीय शुल्क दहा हजार रुपयेचा धनाकर्ष (डी.डी.) (SBI TRE.BRANCH KOLHAPUR GRASS) या नावाने काढणे आवश्यक आहे.
ई लिलाव प्रक्रीयेसाठी दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासुन ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार असून अर्ज WWW-E AUCTION या संकेतस्थळावर दि. 30 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन भरता येणार आहेत.
दि. 2 ते 6 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन धनाकर्ष व अर्ज कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. दि. 9 ते 12 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4.30 वाजेपर्यंत अॅप्रुव्हल व दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी ई लिलाव सकाळी 9.30 ते 12 वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चव्हाण यांनी दिली आहे.

Back to top button