मुंबई | वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची (Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात महानगरपालिकेची रुग्णालये व माताबाल संगोपन केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ (पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी, वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ) पदव्युत्तर पदवी व वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण संवर्गातील पदे कंत्राटी स्वरुपात करारपध्दतीने ६ महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत.
या पद भरती करीता विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखत (Walk in Interview) दि. 30/06/2023 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.) येथे सकाळी ११.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छूकांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळप्रती व साक्षांकित सत्यप्रतीसह विहीत नमुन्यातील भरलेल्या अर्जासह उपस्थित राहावे. अर्जाचा नमुना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. अधिक माहितीकरिता उमेदवारांनी PDF जाहिरात https://shorturl.at/imuLZ या लिंकवर पहावी. (Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (अॅनास्थेशिया) किंवा एम.बी.बी.एस. पदवी आणि डी.ए. (डिप्लोमा इन अॅनास्थेशिया) किंवा समकक्ष पदवी.
ब) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभव.
क) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन | मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र
सदरहू पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीसाठी असुन करारपध्दतीने अस्तित्वात राहतील. निवड झालेल्या उमेदवारास महानगरपालिके बरोबर विहीत नमुन्यात करारनामा करून देणे बंधनकारक राहील. तसेच नियुक्तीच्या कालावधीमध्ये उमेदवाराचे काम समाधानकारक न आढळल्यास तसेच कोणत्याही स्वरुपाची गैरवर्तणूक केल्यास कोणतेही कारण न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल.