वाल्मिक कराडला अटक करताच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या प्रतिक्रियेने खळबळ, ‘हा’ प्रश्न उपस्थित करत म्हणाली… Vaibhavi Deshmukh
पुणे | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मीक कराडला (Walmik Karad) पुणे सीआयडीने ताब्यात घेतले आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वैभवी देशमुख याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाली की, “आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. पोलीस यंत्रणा काम करतेय मग एवढा वेळ का लागत आहे? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करत आहे? आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार? असा सवाल वैभवी देशमुखने उपस्थित केला आहे.
राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडला पुणे सीआयडीने ताब्यात घेतले आहे. या संदर्भातील वृत्त Hello Kolapur वेबपोर्टलने सर्वात आधी प्रकाशित केले होते. अखेर या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
“माझ्या वडिलांच्या हत्येला 22 दिवस झाले आहेत. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी जे तीन आरोपी फरार आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय द्या. माझ्या वडिलांची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा.
वडिल पुन्हा आणू शकत नाही. पण त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आमच्या सगळ्यांच एकच मत आहे, माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे.