निरोगी व घनदाट केसांसाठी उपयुक्त: नारळाचे दूध | Uses Of Coconut Milk

नारळाचे दूध केसांना खोलवर पोषण (Uses Of Coconut Milk) देण्याचे काम करते. ते केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे दूध कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना आराम देते. नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केस मऊ आणि दाट होण्यास मदत होते. तसेच टाळूला खाज सुटणे आणि कोरडेपणा अशा समस्या दूर करण्याचे कार्यही करते. तुम्ही केसांसाठी नारळाचं दूध अनेक प्रकारे वापरू शकता.

नारळाचे दूध व चिया सीड्सचा वापर –
पाव कप नारळाच्या दुधात एक चमचा चिया सीड्स भिजत घाला. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर ते केसांना व स्काल्पला लावून हळुवारपणे मालिश करा. ते 20 मिनिटे तसेच ठेवा. यानंतर सौम्य शांपूने केस धुवावेत. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

नारळाचे दूध लावावे
एका बाऊलमध्ये नारळाचे दूध घेऊन ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे, सकाळी ते फ्रीजमधून काढून घ्यावे. त्यानंतर केस ओले करून घ्यावेत व त्यावर नारळाचे दध लावावे. ते केसांसह स्काल्पवरही लावावे. हा मास्क सुमारे एक तास केसांवर राहू द्यावा. त्यानंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस धुवावेत. आठवड्यातून 1-2 वेळा तुम्ही हा हेअर मास्क वापरू शकता. नियमित वापराने केसांमध्ये फरक दिसून येईल.

नारळाचे दूध व पपईचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा कप पपईचे तुकडे घ्या. ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर या पेस्टमध्ये अर्धा कप नारळाचे दूध घाला. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून केस आणि स्काल्पवर लावा.30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर सौम्य शांपूने केस स्वच्छ धुवावेत. नियमित वापराने केसांमध्ये फरक दिसून येईल.

नारळाचे दूध आणि मधाचा हेअर मास्क –
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये 6 चमचे नारळाचे दूध घ्यावे. त्यामध्ये 3 चमचे मध घालावा. हे दोन्ही पदार्थ नीट मिसळा. त्यानंतर हे मिश्रण केसांवर तसेच स्काल्पवर लावा. काही काळ बोटांनी नीट मालिश करा व नंतर केस धुवून टाका. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.