News

Urvashi Rautela Private Video Leak : उर्वशी रौतेलाचा बाथरूमधील कपडे बदलतानाचा खाजगी व्हिडिओ व्हायरल, इंटरनेट विश्वात खळबळ

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सनी देओलबरोबर ‘सिंह साहेब द ग्रेट’ चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकणारी उर्वशी कधी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. अशातच आता तिचा एक प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिला नेटकऱ्यांकडून चांगलचं ट्रोल केलं जात आहे. उर्वशीचा चक्क बाथरूममधील कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हीडीओने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

उर्वशी रौतेलाच्या लीक झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यामध्ये अभिनेत्री कपडे बदलताना दिसत आहे. पण तिचा हा व्हिडीओ जाणीवपूर्वक रेकॉर्ड केल्यासारखा दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

काहींनी उर्वशीने हा व्हिडीओ फॉलोअर्स वाढवण्यासाठी रेकॉर्ड केल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याच्या कमेंट केल्या आहे. मानव मंगलानी नावाच्या पापाराझी अकाउंटवरून हा व्हीडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर उर्वशी आणि तिच्या मॅनेजरचे याबद्दल संभाषण झाल्याचा व्हीडीओ देखील यानंतर व्हायरल होत आहे. यामध्ये उर्वशी मॅनेजरला चढ्या आवाजात व्हीडीओ पाहिलास का? व्हीडीओ बाहेर कसा गेला असे प्रश्न विचारताना दिसत आहे.

उर्वशी रौतेला प्रसिद्धीसाठी बरेचदा पीआर स्टंट करत असते, त्यामुळे चाहत्यांना हा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंटही वाटत आहे. काही काळापूर्वी क्रिकेटपटू रिषभ पंतबरोबरच्या शाब्दिक वादामुळे चर्चेत राहिलेली उर्वशी रौतेला आता या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

Back to top button