7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

उपाशीपोटी कच्चा पपईच्या ‘या’ पदार्थांचे सेवन करा, Uric Acid होईल त्वरित गायब!

आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक आजार उद्भवतात आणि त्यामध्ये युरिक अ‍ॅसिडचा (Uric Acid) आजार तरूणांमध्येही वाढलेला दिसून येतो. शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते आणि बसण्याउठण्याचा त्रासही असह्य होतो. याशिवाय युरिक अ‍ॅसिड वाढल्याने किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राखण्यासाठी आपले डाएट योग्य असण्याची गरज आहे.

Uric Acid Home Remedies

युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी प्युरीन अधिक प्रमाणात असणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. युरिक अ‍ॅसिड त्वरीत कमी करायचे असेल तर एक कच्चा पदार्थ तुम्ही आहारात समाविष्ट करायला हवा. हा कच्चा पदार्थ म्हणजे जर तुम्ही कच्ची पपई आहारात समाविष्ट केली तर तुम्हाला युरिक अ‍ॅसिड आणि गाऊटसारख्या समस्येतून सुटका मिळू शकते.

डाएटमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असेल तर असे पदार्थ खाऊ नका. कच्चा पपईचे सेवन युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी करता येते. नॅशनल इन्स्टिट्यट ऑफ हेल्थनुसार, कच्च्या पपईच्या सेवनाने ही समस्या त्वरीत कमी करता येऊ शकते.

आरोग्य हेल्थ सेंटरच्या आयुर्वेदिक डॉ. एस. के पांड्ये यांनी सांगितले की, ‘शरीरातील वाढलेले युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी कच्ची पपई खाणे हे फायदेशीर ठरते. यामध्ये विटामिन्ससह फोलेट आणि डाएटरी फायबर अधिक प्रमाणात असून अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सदेखील अधिक प्रमाणात आढळते. नियमित स्वरूपात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात पपईचे सेवन केल्यास, युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात येऊन आर्थरायटिस आणि सांधेदुखीसारखी समस्या गायब होण्यास मदत मिळते.’

कच्च्या पपईमध्ये विटामिन ए, विटामिन सी, मॅग्नेशियम, कॅल्शियमसारखे पोषक तत्व असून युरिक अ‍ॅसिडची समस्या नष्ट करण्यासाठी मदत करते. तसेच कच्ची पपई पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते. कॅलरी, स्टार्च आणि प्युरीनचे प्रमाण पपईमध्ये अत्यंत कमी असून याच्या सेवनाने युरिक अ‍ॅसिडची समस्या त्वरीत कमी होते.

कच्चा पपईचा ज्युस प्या

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी कच्च्या पपईचे सेवन फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही पपईचा ज्युस घेऊ शकता. कच्ची पपई कापा आणि त्यातील सर्व बिया काढून टाका. त्यात 2 कप पाणी घाला आणि मग साधारण 10 मिनिटे मंद आचेवर शिजवा. त्यानंतर मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घ्या. तयार झालेला ज्युस पिऊ शकता. यामुळे त्वरीत युरिक अ‍ॅसिडची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

कच्चा पपईची भाजी

कच्च्या पपईची भाजी करून खाऊ शकता. यासाठी पपई उकडून घ्या आणि उकडल्यावर व्यवस्थित मॅश करा. त्यानंतर त्यात थोडे मीठ, मोहरीचे तेल, हिरवी मिरची बारीक कापून त्यात बारीक चिरलेला कांदा मिक्स करा. याचे भरीत करून चपाती अथवा भाकरीसह खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील युरिक अ‍ॅसिड लगेच कमी होण्यास मदत मिळते.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles