मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (UPSC Recruitment 2023) केली जाणार आहे. एकूण 18 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, फोरमॅन (केमिकल), फोरमॅन (मेटलर्जी), फोरमॅन (टेक्सटाईल), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर), सहाय्यक सरकारी वकील, युनानी फिजिशियन या विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. त्याचा तपशील खाली दिलेल्या PDF जाहिरातीत दिलेला आहे. तो काळजीपूर्वक वाचावा. पात्रता धारण केलेल्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. त्यांनी सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
PDF जाहिरात – UPSC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – UPSC Online Application 2023
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 करिता एकूण 167 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – भारतातील केंद्रीय किंवा राज्य विधानमंडळाच्या कायद्याद्वारे किंवा संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेल्या किंवा विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, 1956 च्या कलम 3 अंतर्गत विद्यापीठे म्हणून घोषित केलेल्या इतर शैक्षणिक संस्थांमधून अभियांत्रिकीची पदवी (संपूर्ण तपशील वाचा)
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. उमेदवारांनी www.upsconline.nic.in या लिंकचा वापर करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
जर अर्जदाराने अद्याप वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली नसेल, ज्याची लिंक आधीच आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, त्याने/तिने या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी आणि त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे जावे.
PDF जाहिरात – UPSC ESE Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – UPSC ESE Online Application 2023
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in