News

Union Budget 2024 Live Updates : देशातील 1 कोटी तरुणांना रोजगार.. प्रत्येक क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची बरसात, कोणासाठी किती तरतूद?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) सादर करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.  

रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपये

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, \’भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ उत्कृष्ट आहे. भारताची चलनवाढ स्थिर राहून ४% च्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रित केले जात आहे.  रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे.

Budget updates : 9 सूत्री पाच योजनांची घोषणा

9 सूत्री पाच योजनांची घोषणा

1. कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता
2. रोजगार आणि कौशल्ये
3. सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
4. उत्पादन आणि सेवा
5. शहरी विकास
6. ऊर्जा संवर्धन
7. पायाभूत सुविधा
8. नवोपक्रम, संशोधन आणि विकास
9. नवीन पिढी सुधारणा

बजेटमध्ये तरुणांसाठी काय?

खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाईल.  

5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप, 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.

MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील, PSU बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर MSME ला कर्ज द्यावे.  MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवल्या जाणार आहेत.

Union Budget 2024-25 LIVE : नोकरदार वर्गासाठी मोठ्या घोषणा 

  • EPFO अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, एका महिन्याच्या पगाराच्या 15,000 रुपयांपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तीन हप्त्यांमध्ये जारी केला जाईल.
  • कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत EPFO ​​योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिलं जाईल.
  • नियोक्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, सरकारनं अर्थसंकल्पात म्हटलं आहे की, अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मासिक योगदानाची दोन वर्षांसाठी 3 हजार रुपयांपर्यंत परतफेड केली जाईल.

Union Budget 2024 : महाबोधी, विष्णूपद मंदिरासाठी कॉरिडोअरची निर्मिती केली जाणार

  • Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech :
  • बिहारमधील महाबोधी मंदिरासाठी कॉरीडोअरची निर्मिती केली जाणार 
  • गया येथील विष्णूपद मंदिरासाठी कॉरिडोअरची निर्मिती
  • पर्यटनाच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करणार 

पीएम आवास योजनेअंतर्गत ( शहरी भाग) १ कोटी मध्यमवर्ग, गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार त्यासाठी १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून पुढच्या पाच वर्षांत २.२ लाख कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजना लागू करण्यात आलेली आहे.  १ कोटी घरांना ३०० यूनिट्सपर्यंत मोफत विज मिळावी यासाठी ही योजना आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या योजनेसाठी १.२८ कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झाले आहेत. 

महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील.

देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाईल.

विशाखापट्टणम-चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही केंद्र सरकारकडू प्रयत्न केला जाणार. राज्य सरकारांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्हासन दिले जाणार

Back to top button