Tuesday, September 26, 2023
HomeCareerमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत अमरावती जिल्ह्यात रिक्त पदाची भरती| UMED...

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत अमरावती जिल्ह्यात रिक्त पदाची भरती| UMED MSRLM Amravati Bharti 2023

अमरावती | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, अमरावती अंतर्गत प्रभाग संघांचे सन 2022-23 तसेच ग्रामसंघांचे सन 2018-19 ते सन 2022-23 पर्यंत या वर्षाचे वार्षिक लेखा परिक्षण अहवाल व उपयोगीता प्रमाणपत्र शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यात तयार करावयाचे आहे. सदर काम करून देण्यास्तव नियंत्रक व महालेखापरिक्षक यांनी निवड केलेल्या सनदी लेखापालाकडून अर्ज दि. 06/07/2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखापाल नियुक्तीचा प्रस्ताव हा दिनांक 06/07/2023 पर्यंत दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद परिसर कम्पि रोड, अमरावती यांचे कार्यालयात रजीस्टर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करण्यात यावे. मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कार्यालयांकडून स्विकारण्यात येणार नाहीत. (UMED MSRLM Amravati Bharti 2023)

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. विहीत नमुना अर्ज “अ” ( ANNEXURE – A) सोबत स्वसाक्षांकीत प्रती सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.

PDF जाहिरातhttps://bit.ly/3CUxJ72
अधिकृत वेबसाईटamravati.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular